आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात २२० रुग्णांची तपासणी
दौंड (BS24NEWS)
आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कर्करोग व आरोग्य तपासणी शिबिर बोरोबेल (ता.दौंड) येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात २२० रुग्णांची तपासणी करण्यात आली .
या शिबिराचे उद्घाटन भाजपा पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कांचन कुल , दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी ,भाग्यश्री खळदकर , उज्वला जाधव,सरपंच नंदकिशोर पाचपुते ,उपसरपंच वर्षा विनोद जगताप , संतोष पाचपुते, बापू महाडिक , विनोद जगताप , राजू पाचपुते, शेखर जगताप, बाळकृष्ण कुंभार ,अमोल पाचपुते, अमित जगताप ,संजय आटोळे आदी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन योगेश्वरी हॉस्पिटल व आमदार राहुल कुल युवा मंच बोरीबेल यांच्या वतीने करण्यात आले होते.