पुणे जिल्हा ग्रामीण

खामगावचे युवा उद्योजक सुखदेव चोरमले यांच्याकडून गरजूंना किराणा किट वाटप…..

यवत(BS24NEWS)
सामाजिक की जपत खामगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, साईराज ग्रुप समूहाचे प्रमुख उद्योजक सुखदेव सोनबा चोरमले यांनी खामगाव-तांबेवाडी (ता. दौंड) येथील चारशेहून अधिक गरजू ग्रामस्थांना घरोघरी जाऊन किराणा साहित्याचे किट देऊन दिवाळी गोड केली. एक दिवाळीचे किट साधारणतः दीड हजार रुपयांपर्यंत असल्याचे चोरमले यांनी सांगितले.
आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त चोरमले गेल्या अनेक वर्षांपासून असे सामाजिक उपक्रम राबवतात. चोरमले यांनी स्वतः आणि परिसरातील तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन किराणा साहित्याचे किट घरोघरी जाऊन मोफत दिले. ऐन
दिवाळीत सर्वसामान्यांना किराणा किट मिळाल्यामुळे येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
खामगाव, तांबेवाडीतील गरजू कुटुंबासाठी सुमारे चारशे दिवाळी किराणा किट वाटप केले. या माध्यमातून ग्रामस्थांच्या सुखात सहभागी होता आले, याचे समाधान वाटते. जनतेचे आशीर्वाद व प्रेम यामुळं कायम समाजकार्याचे काम करण्याचे बळ मिळते असे चोरमले यांनी सांगितले. या प्रसंगी उपसरपंच तुषार बहिरट, ताईबाई कोळपे, दादा कोळपे उपस्थित होते. आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त सुखदेव चोरमले मित्र परिवाराच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. यापुढेही राबवू असेही सुखदेव चोरमले यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!