राजकीयराज्यविशेष बातमी

केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील लवकरच दौंड दौऱ्यावर – आमदार राहुल कुल

आमदार कुल यांनी दिल्ली येथे घेतली भेट, रेल्वेच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा

दौंड(BS24NEWS)

दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुराव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची मुंबई येथे आमदार राहुल कुल यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी रेल्वेच्या असणाऱ्या प्रश्नांबाबत पुढील चर्चेसाठी दिल्ली येथे भेटीसाठी वेळ दिली होती. त्यानुसार दि.२ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये मध्य रेल्वे विभाग, दौंड शहर व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. याबैठकी मध्ये दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी , दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे , पुणे-सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे उर्वरित तांत्रिक काम तात्काळ पूर्ण करून ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावी, खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा तसेच कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या आरयुबी कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून त्याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास होत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत , दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत , दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत व पुणे – हैद्राबाद – पुणे (एसी सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, एलटीटी – विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा , वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर ,उरुळी आणि लोणीच्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी, या मागण्या करण्यात आल्या असून यावेळी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीसाठी स्वतः केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात दौंड तालुक्यात बैठक व स्थळपाहणीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!