क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
दौंड शहरात घरफोडी, २ लाख ५९हजारांचा ऐवज चोरीला
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरात घरफोडी करून २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना घडली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी, रवींद्र उमाकांत उबाळे (रा. गजानन सोसायटी, दौंड, ता. दौंड जि. पुणे) यांच्या राहत्या घरातून दि.२७ऑक्टोंबर ते १नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करून घरातील कपाटातील असणारे २ लाख ५९हजार १०७ रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले असल्याबाबतची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.