पाटस येथे महेश्वर युथ फाउंडेशनच्या वतीने संस्कृती संवर्धन कार्यक्रम उत्साहात साजरा
पाटस(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी एकञित येवून पुर्वजांपासून चालत आलेली संस्कृती युवा पिढीने जतन करण्याचे ठरविले आहे. या उद्देशाने पाटस येथिल मोटेवाड्यावर संस्कृती संवर्धन हा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला.या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
काळाच्या ओघात धनगर समाज आपली संस्कृती विसरत चालला असून पटका हा देखील यातील एक भाग असून याचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे समाज बांधवानी सांगितले.
यावेळी श्री काशिलिंग बिरूदेव देवस्थान उदगाव (कोल्हापूर),श्री बिरूदेव भैरूसिध्द मंडळ यांच्या वतीने धनगरी ओव्या, वालूग, गजेनृत्य,हेमाड,आदी पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या.
मरहट्टी संशोधन व विकास मंडळाचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच इतिहास संशोधक संतोष पिंगळे यांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अनेक समाज बांधवांनी अराजकीय संघटन करीत एकञित रहाण्याचे युवा वर्गाचे एकमत होत असून येणार्या काळात असेच विविध उपक्रम राबवित समाजहिताच्या प्रश्नांवर कार्य करतील अश्या प्रकारचे मत बांधवांनी व्यक्त केले.