कुरकुंभ एमआयडीसीत रिएक्टरचा स्फोट..शोगन कंपनीतील घटना..!
कुरकुंभ(BS2 4NEWS)
कुरकुंभ(ता.दौंड)औद्योगिक वसाहतीतील शोगन ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीत रिएक्टरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.कंपनीत रासायनिक प्रक्रिया चालू असताना अचानक रिएक्टरचा स्फोट होऊन तीन कामगार जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे..स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.स्फोट झाल्याने कंपनीतील पत्रे उडाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे या औद्योगिक वसाहतीने जगाच्या नकाशावर ठळकपणे लक्ष वेधले आहे.कुरकुंभ एमआयडीसी मधील शोगन कंपनीत मच्छर प्रतिबंधक तसेच इतर प्रकारचे रसायन बनविले जाते.कंपनीत दुपारी साधारण तीनच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली ही आग अर्ध्या तासात कुरकुंभ एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली मात्र कुरकुंभ एमआयडीसीत आगीच्या आणि स्फोटाच्या घटना सतत घडत असल्याने सोशल मीडियावर जुने संग्रहित आगीचे फोटो व्हायरल झाल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
किरण पाटील (अग्निशमन अधिकारी)
—
कुरकुंभ एमआयडीसी- साधारण २ वाजून ५० मिनिटांनी आम्हाला आगीचा कॉल आल्यावर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहचलो.आगीची तीव्रता कमी असल्याने आग अर्ध्या तासाच्या आत आटोक्यात आणण्यात आम्हाला यश आले.