दौंड(BS24NEWS) दौंड मध्ये हिंदू-भगिनींच्या झालेल्या छेडछाडीच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलना मध्ये आज दि.१७ रोजी आमदार नितेश राणे सामील होते. दौंड पोलीस स्टेशन वर धडक मोर्चा मध्ये राणे सामील झाले होते. यामध्ये गुन्हेगारांकडून होत असलेले गैरवर्तनांना आळा घालण्याचे पोलीस प्रशासनाला नितेश राणे यांनी आव्हान केले आहे. जर कोणी यापुढे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील व हिंदू भगिनींकडे आणि भावांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचे डोळे नीट ठेवणार नाही असा सज्जड इशारा आमदार राणे यांनी दिला आहे.
दौंडमधील घोलप आणि जमदाडे कुटुंब मारहाण प्रकरणी आरोपी बादशहा शेख यासह आरोपींना ४८ तासात अटक करण्याचा अल्टिमेट
आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे आरोपींना अटक झाली नाही तर ४८ तासानंतर दुसरा एपिसोड सुरू होईल असे त्यांनी सांगितले.यापुढे दौंड मधील प्रत्येक घटनेवरती नितेश राणे लक्ष ठेवून असेल व आगामी काळात विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल. व यापुढेही हिंदू भगिनींच्या पुढे नितेश राणे हजर असेल असेही आमदार राणे यांनी पत्रकार यांना बोलताना संबोधित केले आहे.
यावेळी हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.