दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली, भाऊसाहेब पाटिल नवे पोलिस निरिक्षक
दौंड(BS24NEWS)
दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दौंड शहरातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला आणि तरुणांवर प्राणघातक हल्ला प्रकरणाची आणि त्यातील संशयित आरोपींना अटक न केल्याने भाजपचे आमदार नितेश राणे दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता.
या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांची बदली केली आहे, तर दौंड पोलीस स्टेशनचा तात्पुरता कार्यभार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आला आहे.
दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा भाऊसाहेब पाटील यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये हजर होत कामकाजची सूत्रे हातात घेतली आहेत.