दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी ९० जणांचे अर्ज दाखल…
दौंड(BS24NEWS)
दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९० इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एच. व्ही.तावरे यांनी दिली.
खरेदी विक्री संघ दौंड तालुक्यातील महत्त्वपूर्ण सहकारी संस्था असून संघाच्या निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
आज सोमवार (दि.२१) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. एकाच दिवसात तब्बल ७७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या ९० वर पोहचली आहे.
यामध्ये संस्था प्रतिनिधी ४१,भटक्या विमुक्त जाती जमाती १०, अनुसूचित जाती जमाती २, इतर मागास प्रवर्ग ८, वैयक्तिक सभासद २५, महिला प्रतिनिधी ४ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.