क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

दौंडच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत भरल्या २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा अन् गुन्हा दाखल केला अज्ञात व्यक्तिवर!

दौंड(BS24NEWS)

दौंड शहरातील एचडीएफसी बँकेत नकली २६ हजार ५०० रुपयांच्या नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटिल यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, देऊळगावराजे (ता.दौंड ) येथील एक व्यक्ती ( दि.१९) रोजी दौंड शहरातील एचडीएफसी बँकेतील खात्यावर २७ हजार रुपये भरण्यासाठी गेले असता यातील २६ हजार पाचशे रुपयांच्या नोटा नकली असल्याचे शाखेतील बँक मॅनेजर यांच्या निदर्शनास आले असून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एचडीएफसी बँक दौंड शाखेचे व्यवस्थापक अनुप संभाजी भोसले (वय-38 वर्षे , रा.ईश्वरीय हेरिटेज ,दौंड ता.दौंड जि पुणे मुळ रा.मियामी अपार्टमेन सिंहगड रोड,पुणे )यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान ,ज्या व्यक्तीने बँक खात्यात बनावट नोटा भरल्या त्या व्यक्तिवर गुन्हा दाखल न होता अज्ञात व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो पोलिसांनी हि दाखल केला असल्याने याबाबत शहरात सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!