भीमा पाटसला नवसंजीवनी आमदार राहुल कुल यांना यश ,कारखाना देणार २५०० पहिली उचल
केंद्रीय मंत्रीगटाचे प्रमुख, देशाचे सहकार मंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे आमदार कुल यांनी मानले आभार
दौंड (BS24NEWS) एम. आर. एन. भिमा शुगर अँड पावर लि. संचलित भिमा सहकारी साखर कारखाना पाटस उसाच्या पहिल्या हप्त्यापोटी उचल २५०० रूपये देणार असल्याची माहिती एमआरएन ग्रुपचे व्यवस्थापक रविकांत पाटिल यांनी दिली. ते कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी पाटस येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित सभेवेळी बोलत होते.
यावेळी बोलताना व्यवस्थापक रविकांत पाटील म्हणाले की , भिमा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ सुरू होत असून गाळपास आलेल्या उसाच्या पहिल्या हप्त्यापोटी कारखाना २५०० रुपये पाहिली उचल देणार असून पंधरा दिवसांनी ऊस गाळपासाठी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै वर्ग होणार आहेत. तसेच ऊस तोडणी वाहतूकदारांचे पैसै दर दहा दिवसांनी दिले जातील. कामगारांचे पगार प्रत्येक महिन्याला होणार आहेत. भिमा साखर कारखान्याच्या सभासदांनी कारखान्यास गाळपासाठी ऊस देवून कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, मी कारखान्यात २१ वर्षाच्या कार्यकाळात कारखान्याला राजकारणाचा लवलेश लागू दिला नाही. इथून पुढेही तो लागू देणार नाही. कारखाना ४० दिवसांत सुरू करण्यासाठी कामगारांनीही दिवस रात्र काम करून मोलाचे सहकार्य केले आहे. केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखाना सुरु करण्यासाठी सहकार्य केले असून त्यांचे यावेळी आमदार राहुल कुल यांनी आभार मानले.
कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांच्या हस्ते ऊस गव्हाणीचे पूजन करण्यात आले.
यावेळी भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, सत्वशील शितोळे माजी संचालक महेश भागवत, माजी आमदार रंजना कुल, भाजपा पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांच्यासह सर्व आजी माजी संचालक तसेच निराणी ग्रुपचे शरणाप्पा शिरसे, महावीर घोडके, तुकाराम देवकाते, अनिल पोरे, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विकास शेलार यांनी करत आभार मानले.