दौंड शहरात बळजबरीने खतना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल….
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरातील एका मागासवर्गीय समाजातील वीट भट्टी कामगाराची येथील तिघांनी बळजबरीने खतना केली असल्याची खळबळजनक घटना घडली असुन याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बबलू मिलिंद चव्हाण(वय २८,रा. कुंभार गल्ली, दौंड) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार कुमेल जब्बार कुरेशी, आसिफ शेख(रा. कुंभार गल्ली ,दौंड) व डॉक्टर( पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बबलू चव्हाण हा २०२० पासून दौंड मधील वीट भट्टीवर काम करतात. याआधी २०१८ साली त्यांचा येथील मुस्लिम महिलेबरोबर कुर्डवाडी येथे विवाह झालेला आहे.दि.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी आरोपी कुमेल कुरेशी, आसिफ शेख व डॉक्टर यांनी फिर्यादी बबलू चव्हाण यांच्या घरात घुसून त्यांची बळजबरीने सुंता केली. या कृत्यामुळे हिंदू धर्माचा व धार्मिक श्रद्धेचा त्यांनी अपमान केला आहे. ही घटना घडल्यानंतर भीतीपोटी फिर्यादी बबलू चव्हाण हे घर सोडून गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
दौंड पोलिसांनी या आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.