पुणे जिल्हा ग्रामीणशैक्षणिक

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद – वैशाली नागवडे

दौंड(BS24NEWS)

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिम्मित इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशनच्यावतीने

घेण्यात आलेल्या चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत सुमारे 20 हजार विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती पुणे विभागाच्या राष्ट्रवादी काँगेसच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिली.

यावेळी इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशनच्या पदाधिकारी वर्षाराणी गायकवाड ,मधुबाला जगदाळे या उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना नागवडे म्हणाल्या की,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिम्मित दौंड तालुक्यात इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फाउंडेशनच्यावतीने चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 20 हजार विद्यार्थ्यानी सहाभाग घेतला होता.

चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ही इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी आणि इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी या दोन गटात घेण्यात आली.

या सपर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक गटात पाहिले तीन क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना सर्वाना ट्रॉफी व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन लवकरच गौरवण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!