पुणे जिल्हा ग्रामीण
पुण्याच्या पुर्व भागात पीएमआरडीएचे कार्यालय सुरू करा – आमदार राहुल कुल
दौंड(BS24NEWS)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मध्ये पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ८१६ गावांचा समावेश झाला असून त्यात दौंड तालुक्यातील ५१ गावांचा देखील समावेश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना औद्योगिक व रहिवासी झोन परवानगी, बांधकाम परवानगी व इतर विविध परवानग्या व कामासाठी वारंवार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय आकुर्डी येथे जावे लागत असुन नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरीकांच्या सोयीसाठी PMRDA चे अतिरिक्त किंवा विभागीय कार्यालय पुण्याच्या पूर्व भागात सुरु करावे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेमध्ये केली आहे.