पुणे जिल्हा ग्रामीण
भिमा पाटस कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा – आमदार राहुल कुल
दौंड(BS24NEWS)
भीमा – पाटस कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी दिली.
भीमा- पाटस कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या 35 हजार टनाचे 2500 रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे .कारखान्याने आज दि.5जानेवारी अखेर 55 हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार कुल यांनी केले.