जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत, पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंडची “खिलोना” ही एकांकिका जिल्ह्यात प्रथम …
दौंड(BS24NEWS)
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व डायट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खीलोना या नाटीकेस खाजगी प्राथमिक हिंदी विभाग- (मुले – मुली) गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
न्यू हिंद स्कूल पुणे येथे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली होती.त्याचा निकाल जाहीर झाला.
या नाटकातील रितू च्या भूमिकेसाठी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी स्वागता प्रदीप वाघ हिस, तालुका व जिल्हा या दोन्ही स्तरावर भूमिकेसाठी बेस्ट ऍक्टरचे तर उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी तालुका व जिल्हा अश्या दोन्हीं स्तरावर प्रशालेचे कलाशिक्षक महेश मोरे यांना नामांकन मिळाले आहे.
या नाटकामध्ये स्वागता वाघ, वेदांत अवचर, शर्वील गिरी, श्रवण दाते, रुद्र शेलमकर, स्वस्ति गाढवे, श्रेया ननवरे, हर्षवर्धन काटकर या विद्यार्थ्यानी प्रमुख भूमिका केल्या.नाटकाचे लेखन सुधीर कदम व दिग्दर्शन कलाशिक्षक महेश मोरे यांनी केले तसेच पार्श्व संगित संगीत शिक्षक संजय मोरे यांनी दिले.
यशस्वी विद्यार्थ्यांना व शिक्षक यांना, प्रशालेच्यावतीने प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांच्या शुभहस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबर, आपल्या अंगी असणारे सुप्त गुण ही जोपासायला हवेत, शाळा नेहमीचं आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी नेहमी सज्ज असल्याचे सांगत विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.