जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेत, दौंड मधील शेठ जोतिप्रसाद विद्यालयाचे घवघवीत यश
दौंड(BS24NEWS)
जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेत, दौंड मधील शेठ जोतिप्रसाद विद्यालयाची हिंदी एकांकिका चिंटू जिल्ह्यात प्रथम तर मराठी एकांकिका स्पंदन व इंग्रजी एकांकिका ब्रिथ ऑफ लाईफ या एकांकिकांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाले असल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य सत्यदेव खाडे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) पुणे आयोजित जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा नुकत्याच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह, पुणे येथे संपन्न झाल्या. यात जिल्हास्तरावर प्रशालेने सादर केलेल्या सर्व नाटिकांना जिल्हा स्तरावरील सांघिक क्रमांक प्राप्त झाले. हिंदी नाटिका ‘चिंटू’ , मराठी नाटिका ‘स्पंदन’ व इंग्रजी नाटिका ‘ब्रीथ ऑफ लाईफ’ या सर्व नाटिकांचे उत्कृष्ट लेखन प्रशालेतील उपशिक्षिका माधुरी काकडे यांनी केले होते. वरील सर्व नाटिकांना जिल्हास्तरावर उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून उपशिक्षक गुरुनाथ कोळी, विमल घालमे, योगिता धेंडे यांना नामांकन मिळाले तर स्वाले शेख, प्रसाद जगताप, समीक्षा दळवी यांना उत्कृष्ठ अभिनयासाठी नामांकन मिळाले. प्रशालेने सादर केलेल्या तीनही नाटिकांना जिल्हा स्तरावर क्रमांक प्राप्त झाले. यात हिंदी नाटिका ‘चिंटू’ ही मुलांच्या लहान गटातून जिल्ह्यात प्रथम आली.
मराठी नाटिका ‘स्पंदन’ ही मुलांच्या मोठ्या गटातून जिल्ह्यात द्वितीय आली तर इंग्रजी नाटिका ‘ब्रीथ ऑफ लाईफ’ ही मुले -मुली एकत्र लहान गटातून जिल्ह्यात द्वितीय आली. शिक्षकांसाठी जिल्हा स्तरावर नाट्यसंहिता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील उपशिक्षिका माधुरी काकडे यांनी लिहिलेल्या मराठी नाटिका ‘स्पंदन’ व हिंदी नाटिका ‘चिंटू’ या दोन्ही नाट्यसंहितांना जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट नाट्यसंहिता लेखनाचा पुरस्कार प्राप्त झाला.
सर्व यशस्वी नाटिकांना उपशिक्षिका कुंतिका चौदार, मनिषा रंधवे, उपशिक्षक श्याम चव्हाण, सोमनाथ चव्हाण, प्रमोदकुमार लांडगे, श्रीकृष्ण भुजबळ, कलाशिक्षक विजय बारवकर, सुग्रीव कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेत शेठ जोतिप्रसाद विद्यालयास घवघवीत यश मिळाल्याबद्दल सर्व यशस्वी बालकलाकारांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया प्रशालेचे प्राचार्य सत्यदेव खाडे , उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर ,
उपमुख्याध्यापिका रंजना मस्के, पर्यवेक्षिका डायना पीटर्स व सेवक वृंदाने केले.