पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद…
दौंड(टीम – बातमीपत्र)
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये बिबट्याचा वावर वाढला असल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता.या भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला अखेर यश आले आहे.मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून या भागात सतत पिंजरा लावण्याची मागणी होत होती.वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गलांडवाडी येथे पिंजरा लाऊन बिबट्यास जेरबंद केले आहे.