सावधान, कोरोनाने पुणे जिल्ह्यात काढले डोके वर!
दौंड (टीम – बातमीपत्र) देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आढळून आल्याने कोरोना ने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात बुधवारी कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1 हजार 648 वर गेली आहे. तर कोविडबाधित एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्यात अधिक रुग्ण आहे. पुण्यात 496, मुंबईत 361 आणि ठाण्यात 314 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे सर्दी , ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यातच एच3एन2 च्या विषाणूने डोके वर काढले आहे, त्यामुळे नागरिकांचा धोका दुप्पट झाला आहे.