कृषीपुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकऱ्यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार – हर्षद तावरे
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकऱ्यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंडचे सहाय्यक निबंधक हर्षद तावरे यांनी दिली.
शासनाच्या नविन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आत्ता बाजार समिती निवडणूकीत उभे राहता येणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेतकरी असल्याचा पुरावा म्हणुन दाखला जोडावा लागणार आहे. शेतकरी ग्रामपंचायत किंवा सोसायटी या दोन्हीही प्रवर्गात अर्ज दाखल करू शकत आहे. अशी माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी तावरे यांनी दिली.