कृषीपुणे जिल्हा ग्रामीण
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी भाजपचा मेळावा – माऊली ताकवणे
राहु (टीम – बातमीपत्र) दौंड तालुका कृषी उपन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौंड तालुका भाजपकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दिली. या मेळाव्याला दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
हा मेळावा शुक्रवार दि. ३१ मार्च २०२३ रोजी सकाळी दहा वाजता चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात होणार आहे.