कृषीपुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २ लाख ८८ हजारावर शेतकऱ्यांना लाभ

पुणे(टीम – बातमीपत्र)

अल्पमुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून त्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी ५७ कोटी ३१ लाख ७७ हजार २५ रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत देण्याची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते.

 

या योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ६० हजार २५४ शेतकऱ्यांना १२ कोटी ९१ लाख ६९ हजार ९३९ रुपये आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून २ लाख २८ हजार ६६३ शेतकऱ्यांना ४४ कोटी ४० लाख ७ हजार ८६ रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!