मुंबई (टीम बतमीपत्र) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल रात्री उशिरा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे उत्तर प्रदेश च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. शिंदे यांचे स्वागत केले. तसेच उत्तर प्रदेश वासियांनी श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.
या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीष महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य अनेक मंत्री तसेच आमदार, खासदार देखील सहभागी आहेत.
मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार लखनऊ येथे निवासी थांबलेले असून असून ते आज अयोध्येत ‘प्रभू श्री रामचंद्र’ यांचे दर्शन घेतील. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.