उगाच म्हणतं नाहीत आरोग्यदूत… आमदार असावा तर असाच, पुण्यातील नगरसेविका व अपघातग्रस्त नागरिकांकडून आमदार कुल यांचे आभार
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पुणे – सोलापूर महामार्गावर मळद या ठिकाणी झालेल्या बस अपघातातील नागरिकांना मदत केल्याने भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला अध्यक्षा व माजी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी आमदार राहुल कुल यांच्या कामाबद्दल आभार व्यक्त करणारी पोस्ट सोशल मिडियात टाकत आभार व्यक्त केले आहेत.
आमदार राहुल कुल यांना सकाळी अपघात झाल्याचे समजताच सर्व प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क करत सर्व अपघात ग्रस्तांना प्रथोमपचार द्या अश्या सुचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर दौंड व भिगवण येथे प्रथोमपचार दिले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तहसीलदार संजय पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांच्याशी संपर्क साधत, पुणे येथे रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी ८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या तसेच एका रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने यवत येथील सामजिक कार्यकर्ते संदिप दोरगे यांच्याशी संपर्क कार्डियाक रुग्णवाहिका देखील त्यांना देण्याची मागणी करत ती उपलब्ध करून सर्वच रुग्णांना पुणे येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची फेसबुक पोस्ट – https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02xmVkwEJQSTwFXVf2thEj5e8etDMZVPYYSV1RFgAbUqnSufxykHupyUXQQ7fhMpofl&id=10006
आमदार कुल हे नेहमीच नागरिकांनी आरोग्याच्या बाबत मदतशिल असतात. आजच्या या मदतीचे त्यांचे संपूर्ण जिल्हयात कौतुक होत आहे.