दौंड पुरंदरला मिळाले नवे प्रांताधिकारी
प्रमोद गायकवाड यांची बदली, मिनाज मुल्ला नवीन प्रांताधिकारी
दौंड (टीम- बातमीपत्र) – पुणे विभागातील महसूल प्रशासनामध्ये अखेर फेरबदल करण्यात आले आहेत. दौंड – पुरंदरला मिनाज मुल्ला, तर बारामती – इंदापूरला वैभव नावडकर यांची उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे आदेश रात्री उशीरा निघाला आहे. काल रात्री उशीरा निघालेल्या आदेशात ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे – श्री. समीर शिंगटे – उपविभागीय अधिकारी पन्हाळा, श्रीमती किर्ती नलावडे – सहाय्यक आयुक्त मवाक, पुणे, संतोषकुमार देशमुख – उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ३ सोलापूर, विजयसिंह पाटील – निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली, गीतांजली शिर्के – उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, पुणे नागरी समूह (१ वर्ष मुदतवाढ), अभिषेक देशमुख – नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक), पुणे