पुणे महसूल विभागातील ३२ तहसीलदारांच्या बदलीचे आदेश निघाले
पुणे (टीम – बातमीपत्र) पुणे महसूल विभागातील ३२ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, रात्री उशिरा याबाबत आदेश राज्याचे महसूल विभागाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांच्या सहीनिशी निघालेले आहेत.
या निघालेल्या आदेशामध्ये दौंड, बारामती, वेल्हा, मावळ, आंबेगाव, मुळशी या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश असून, दौंड तहसीलदार संजय पाटील यांची बदली तहसीलदार तथा सहाय्यक पुनर्वसन अधिकारी उजनी प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आली आहे.
बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली तहसीलदार गोंडपिंपरी जिल्हा चंद्रपूर येथे करण्यात आली असून त्यांचे जागेवर श्री. गणेश शिंदे तहसिलदार शिराळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंबेगावच्या तहसीलदार श्रीम रमा जोशी यांची बदली तहसीलदार कार्यालय अमरावती येथे करण्यात आली आहे. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली धानोरा तहसीलदार जिल्हा गडचिरोली येथे करण्यात आली आहे
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांची बदली शिरूर कासार जिल्हा औरंगाबाद येथे तहसीलदार म्हणून करण्यात आली असून, त्यांचे जागेवर रणजीतकुमार भोसले, तहसिलदार वाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांची बदली अप्पर तहसीलदार कोठारी जिल्हा चंद्रपूर येथे करण्यात आली असून त्यांचे जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले दिनेश पारगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.