शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेत शेळके व रोहन कवडे यांचा प्रथम क्रमांक
दौंड(टिम – बातमीपत्र)
दौंड शहरात शिवजयंती निमित्त पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात सर्वेश शेळके याने तर खुल्या गटात रोहन कवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे यंदा अकरावे वर्ष होते.
शहरातील स्वर्गीय लाजवंती गॅरेला हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे संयोजन दौंड शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या विद्यमाने करण्यात आले होते. नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरूमुख नारंग यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॅा. प्रा. अरूणा मोरे, डॅा. प्रा. मधुकर मोकाशी, डॅा. जयकंवर भंडारी, शिवजयंती समितीचे अध्यक्ष आनंद पळसे, देवदत्त शेणोलीकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू, पूर्वा शहा, आदी या वेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियमित सराव आणि प्रयत्नांमध्ये सातत्य राखावे. वक्तृत्व ही कला असून ती जोपासण्यासाठी नियमित वाचन, निरीक्षण आणि माहितीचे संकलन करीत उत्तमरित्या सादरीकरण करण्याचे आवाहन राज्य राखीव पोलिस दलाचे निरीक्षक सचिन डहाळे यांनी या वेळी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ( गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक) :-
* इयत्ता १ ली ते ४ थी गट : सर्वेश किरण शेळके, इशिता नितीन गिरिमकर, स्वरा पराग मिसाळ.
* इयत्ता ५ वी ते ८ वी गट : वैष्णव संतोष जांभळे, वैभव अरूण कोकरे, तनवीर रवींद्र दवणे.
* इयत्ता ९ वी ते १२ वी गट : समृध्दी नीलेश गुंड, आरती अरूण कोकरे, तन्वी नारायण कुरूमकर.
* खुला गट : रोहन जोतिराम कवडे, रवींद्र नारायण दवणे, आस्मा अजीज पठाण.
तर स्वरा सुनील शेळके, स्मृतिका पांडुरंग ढवाण, वैष्णवी राजेंद्र नागवडे, सुविद्या विशाल चौधरी यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पोलिस निरीक्षक सचिन डहाळे यांच्यासह डॅा. प्रा. अरूणा मोरे, डॅा. मधुकर मोकाशी, गुरूमुख नारंग, शिवजयंती समितीचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, सचिन कुलथे, अशोक जगदाळे, आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. वैशाली जाधव, प्रा. दिनेश पवार, अर्चना साने, आरती लेले, सुवर्णा साळुंखे , एस.बी. खामकर, किशोर लडकत व सुनील शेळके यांनी परीक्षण केले. संयोजक शामराव वाघमारे, विनय लोटके, सोमनाथ लंवगे, मुख्याध्यापक बाळासाहेब वागस्कर, अशोक भूजबळ, आदींनी संयोजनासाठी सहकार्य केले.