दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे भाजपचे तगडे आव्हान..
दौंड (टिम – बातमीपत्र) दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीच्या दिवसापर्यंत १६७ उमेदवारांनी माघारी घेतली असून 18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांची एक हाती सत्ता आहे. मात्र यंदाची पंचवार्षिक निवडणुकी रंगतदार होणार असून भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांनी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समितीचे निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :-
सहकारी संस्था मतदार सर्वसाधारण गटातून – शरद बापूराव कोळपे (दहिटणे),भारत सुखदेव खराडे (राजेगाव),बाळासाहेब गणपत शितोळे (खोपोडी)संतोष रघुनाथ आखाडे (कासुर्डी), बापूसाहेब शिवाजी झगडे (कुरकुंभ),डॉ.रामदास बाबा रुपनवर (बोरिपार्धी),नितीन भिमराव वाळके (मलठण), महिला राखीव गटातून -नलिनी पांडुरंग शितोळे (पाटस),शितल विनोद काळे (आलेगाव), भटक्या विमुक्त जाती जमाती मधून – अशोक पंढरीनाथ हंडाळ (केडगाव), इतर मागास प्रवर्गातून – दत्तात्रय दामोदर बारवकर (देऊळगाव गाडा), ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून- अतुल लक्ष्मण ताकवणे (पारगाव), गणेश अंकुश जगदाळे (लिंगाळी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून –अशोक महादेव फरगडे (वरवंड),अनुसूचित जाती जमाती मधून – राहुल गणपत चाबुकस्वार (कानगाव), आडते व व्यापारी मतदार संघातून – श्रीकांत चंद्रकांत कदम (गलांडवाडी), किशोर पांडुरंग भोसले (केडगाव), हमाल व तोलारी मतदारसंघातून- कालिदास किसन रुपनवर(बोरिपार्धी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :-
सहकारी संस्था मतदार संघ (सर्वसाधारण)– कल्याण चंदर पवार(सोनवडी), संतोष अनु वरघडे (पाटस), गजीनाथ दादा आटोळे (नंदादेवी), आत्माराम साहेबराव ताकवणे (पारगाव), अजित दिलीप शितोळे (पडवी), सचिन लालासो शेळके (केडगाव), विष्णू नानासो सूर्यवंशी (देऊळगाव राजे), महिला राखीव गटातून – वर्षा मुकेश मोरे (राजेगाव), गीतांजली यशवंत शिंदे (राहू), भटक्या विमुक्त जाती जमाती मधून – बाळासाहेब मारुती शिंदे (मिरवडी), इतर मागास प्रवर्गातून – जीवन दत्तात्रय म्हेत्रे (सहजपूर), ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून – काका उर्फ संतोष शिवाजी तापकीर (वाळकी), संभाजी भीमराव खैरे(हिंगणीबेर्डी), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक – उत्तम किसन टेमगिरे (भरतगाव) , अनुसूचित जाती जमाती मधून– राजेश सोनबा सोनवणे (पाटस), आडते व व्यापारी मतदार संघातून – संपत बबनराव निंबाळकर (केडगाव), सुनील विश्वनाथ निंबाळकर (केडगाव), हमाल व तोलारी मतदारसंघातून- पोपट बाळू शेंडगे (केडगाव) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोसायटी मतदासंघांच्या सर्वसाधारण जागेसाठी अशोक बापू फडतरे, विठ्ठल चांगदेव दोरगे, बाळासाहेब कुशाबा निवांगुणे या तीन जणांनी अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज ठेवले आहेत. त्यामुळे सोसायटी मतदारसंघाचा सर्वसाधारण प्रवर्ग वगळता इतर मतदासंघांत थेट राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे.