शिवसेना (उबाठा गट) व राष्ट्र्वादीच्या वादात पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांचा अखेर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
दौंड (टीम बातमीपत्र) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्याच्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या सभेच्या बाबत मागील काही दिवसापासून मोठा वाद सुरु, दौंड तालुका कृषी उत्पन्न बजार समितीच्या निवडणूकीत एकही जागा मिळाली नसल्याने, राष्ट्रवादी हा शिवसेनाचा वापर करीत असून भीमा पाटस बाबत घेण्यात येणारी येथील सभा रद्द करवी अशी मागणी जिल्हाप्रमुख पासलकर यांनी केली परंतु पक्षश्रेष्ठी यांनी ही विनंती अमान्य केल्याने पासलकर यांनी हा निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
महेश पासलकर यांनी आपल्या सोशल मीडिया वरून खास शैलीत माजी आमदार रमेश थोरात यांना विरोध करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून आपली भूमिका स्पष्ट केली होती, यावरून असे दिसून आले होते की राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी आणि मित्र पक्षांचा पदाधिकाऱ्यांशी झालेली दगाबाजी हेच महेश पासलकर यांच्या नाराजीचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे.
तर महेश पासलकर यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट व्हायरल केल्या आहेत त्या सविस्तर वाचा….
१) खासदार, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्यात अडीचवर्ष सरकार तरी #भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर चक्कार शब्द काढला नाही, आणि म्हणे संजय राऊत साहेबांची सभा घ्यायची #दौंडची सुज्ञ जनता….
२) जिल्हा बँकेत जनतेच्या ५१२ कोटी रूपयांना वाळवी लागली त्याचा हिशोब देता येईना आणी चाललेत कारखान्यासाठी सभा घ्यायला…
३) जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना #भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याबाबत काहीच केले नाही आणी आता चाललेत सभा घ्यायला
# सूज्ञ दौंडकर…
४) संजय राऊत साहेबांची सभा घ्यायची ज्यांना हौस आहे त्यांनी त्यांच्या नेत्यांची घ्यावी ना…
५) मागिल ७ वर्षापासून सेस लिलाव घेतला व्यापा-यांकडून वसूल केलेली रक्कम कुठे जाते लवकर होणार चौकशी #दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती…