आ. धंगेकरांच्या संशयित भुमिकेमुळे दौंडमध्ये राष्ट्रवादीची गोची…? अगोदर आ. कुल यांच्या वरती टीका करतात आणि दौंड मध्ये येवून आ. कुल यांचा फोटो असलेले दूध पिशवीचे मुस्लिम बांधवांना वाटप करतात. तेव्हा…
दौंड (टीम बातमीपत्र) आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा असे वक्तव्य काँग्रेसचे आ. रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसापूर्वी दौंडचे आ. राहुल कुल यांच्या वरती टीका करताना केले होते, आ. धंगेकर हे दौंडचे सुपुत्र असले तरी आ. कुल यांना वारंवार धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत वारंवार वेगवेगळी वक्तव्य करून आ. कुल यांच्यावर निशाना साधण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार राहुल कुल व प्रेमसुख कटारिया मित्र मंडळ हे गेले अनेक वर्षापासून रमजान ईद निमित्त दौंड मध्ये मापक दरात मुस्लिम बांधवांना दूध वाटप करतात यावर्षी देखील सुभाष आण्णा कुल सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दूध वाटप करण्यात आले आहे.
मात्र रमजान ईद निमित्त आ. रवींद्र धंगेकर दौंडमध्ये आले असता त्यांनी आ. राहुल कुल आणि दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचे फोटो असलेल्या दूध पिशवीचे वाटप मुस्लिम बांधवांना यावेळी केले असल्याचे निदर्शनास आले. आ. धंगेकर यांच्या या संशयित भूमिकेमुळे दौंडकरांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आ. धंगेकरांच्या या कृत्यामुळे दौंड मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, काँग्रेसचे आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांच्या या भूमिकेमुळे दौंड मध्ये राष्ट्रवादीची गोची झाली आहे हे मात्र नक्की.