धक्कादायक! दौंडमध्ये मोबाईल चोरण्यासाठी चक्क युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला, सुदैवाने….
दौंड(टीम – बातमीपत्र)
दौंड रेल्वे स्थानक ते हुतात्मा चौक दरम्यान पायी जात असताना मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने एका युवकावर हल्ला करण्यात आला मात्र युवकाने प्रतिकार केल्याने हल्लेखोरांची दुचाकी व हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू मिळाला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड शहरातील युवक सौरभ संतोष भंडारी (रा. गांधी चौक, दौंड) हा दि.6 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानक ते हुतात्मा चौक दरम्यान पायी जाताना फोनवर बोलत असताना त्याचा मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने त्याच्यावर अचानक एका दुचाकीवरून पाठीमागून येत दोन जणांनी हल्ला केला मात्र या दोन्हीही हल्लेखोरांना सौरभ भंडारी याने प्रतिकार करत हल्लेखोरांची दुचाकी पकडुन धरली असता हल्लेखोर त्या दुचाकीवरून पडले यावेळी त्यांच्याकडे असणारा सुरा ही खाली पडला यावेळी सौरभ भंडारी याने आरडाओरडा केल्याने दोन्हीही हल्लेखोराने पळ काढला आहे.
दरम्यान दौंड शहरातील अनेक नागरीक हे रेल्वेने प्रवास करीत असतात यामुळे रेल्वे स्थानक ते हुतात्मा चौक हा रस्ता कायम वाहतुकीचा असतो माञ या रस्त्यावरच अश्या प्रकारे हल्ला होत असेल तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.