दौंड शहरातील युवा कार्यकर्ते अमोल जगताप व रोहन घोरपडे यांचा शिवसेनेत प्रवेश..
दौंड (टीम -बातमीपत्र)
दौंड शहरातील नेहमी आपल्या सामाजिक कामाने प्रसिद्ध असणारे एस. आर. जे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल जगताप व मराठा महासंघाचे दौंड शहर युवक अध्यक्ष रोहन घोरपडे यांनी माजी राज्यमंत्री शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बारामती लोकसभा संपर्कप्रमुख अँड. गिंताजली ढोणे,
जिल्हाप्रमुख पांडुरंग मेरगळ , तालुका प्रमुख अँड. बापूसाहेब दिवेकर, शहर संघटक सोमनाथ दिवटे, नितीन तुपसौंदर्य, प्रतीक बनसोडे हे उपस्थित होते.
यावेळी विशाल मदने, प्रथमेश कदम, विकी घोडके, योगेश बलाढये, वैभव उतरंडे, योगेश गायकवाड, राकेश भोसले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या धडाक्याने प्रेरित होऊन सर्व युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असे प्रवेश केलेला कार्यकर्त्यांनकडून सांगण्यात आले.