कृषीपुणे जिल्हा ग्रामीणराजकीयविशेष बातमी

दौंड बाजार समितीत आमदार राहुल कुलांनी सत्ता उलथवली ,प्रथमच भाजपचे वर्चस्व..

सभापतीपदी गणेश जगदाळे व उपसभापतीपदी शरद कोळपे विजयी.

दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर इतिहासात प्रथमच भाजपने वर्चस्व मिळवले असून सभापतीपदी गणेश जगदाळे व उपसभापतीपदी शरद कोळपे यांची निवड झाली झाली.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी पार पडली होती. यावेळी भाजपला नऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले संपत निंबाळकर यांचा दुर्दैव मृत्यू झाला. त्यामुळे संख्याबळ हे भाजप 9 व राष्ट्रवादी 8 झाले.
गुरुवारी (दि.25)रोजी दौंड येथे बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपकडून सभापती पदासाठी गणेश जगदाळे व राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी बाळासाहेब शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपसभापती पदासाठी भाजपकडून शरद कोळपे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्षा मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले.
यामध्ये सभापतीपदासाठी गणेश जगदाळे यांना 9 व बाळासाहेब शिंदे यांना 8 मते मिळाली.उपसभापती पदासाठी शरद कोळपे यांना 9 व वर्षा मोरे यांना 8 मते मिळाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हर्षित तावरे यांनी काम पाहिले.
यावेळी सर्व संचालकासह आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,नंदू पवार,नामदेव बारवकर,महेश भागवत,माऊली ताकवणे,नीलकंठ शितोळे ,धनजी शेळके, हरिभाऊ ठोंबरे, तुकाराम ताकवणे,विकास शेलार,जयदीप सोडनवर, उमेश देवकर आदी उपस्थित होते.
*केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवणार-कुल*
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीने प्रथमच वर्चस्व निर्माण झाले असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना बाजार समितीमध्ये राबवणार असून विरोधकांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार राहुल कुल यांनी दिली.

*ना गुलाल.. ना… फटाके..*
दौंड तालुका बाजार समितीचे राष्ट्रवादी चे ज्येष्ठ संचालक संपत निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. बाजार समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असतांना आमदार राहुल कुल यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकर्त्यांनी ना गुलाल उधळला ना फटाके वाजवले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!