शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहा – आमदार राहुल कुल
दौंड (टीम-बातमीपत्र)
अधिकाऱ्यांनी शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले आहे. ते दौंड शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालयात आयोजीत शासन आपल्या दारीया उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन शासन आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा व वेळ वाचावा या हेतूने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी प्रमुख कार्यकत्यांनी सूचना राहील की केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खुप योजना सुरु आहेत त्या योजना गरजु नागरिकांपर्यंत पोहचवा. अधिकाऱ्यांनी हि त्यांच्याकडे असणारी कामे ही आठ दिवसात निपटारा करावा म्हणजे कामे प्रलंबित पडणार नाहीत. नागरिकांचे छोटे छोटे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना मदत करा. त्या अडचणी सोडवुन द्या असे सांगत कामकाज गतिमान करण्याच्या सुचना ही त्यांनी यावेळी दिल्या .
याप्रसंगी दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार अजित दिवटे, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे,माजी नगरसेवक नंदु पवार, भिमा पाटसचे संचालक पंढरीनाथ पासलकर , हरिभाऊ ठोंबरे आदी उपस्थित होते.