पुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहरविशेष बातमी

माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पुणे विभाग आणि जिल्हा सर्वोत्तम

पुणे(टीम – बातमीपत्र)
माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत उच्चतम कामगिरी बद्दल पुणे महसूल विभाग राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटातून एकूण ८ पुरस्कार पुणे जिल्ह्याला प्राप्त झाले. यामध्ये अमृत गट (राज्यस्तर) अंतर्गत १० लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात राज्यस्तरावर पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला पहिला क्रमांकाचा आणि पुणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. याच गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला जाहीर झाला.
नगर परिषद व नगर पंचायत गट अंतर्गत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये राज्यस्तरावर लोणावळा नगर परिषदेला दुसऱ्या क्रमांकाचा आणि बारामती नगर परिषदेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेला जाहीर झाला. याच गटात विभागस्तर पुरस्कार अंतर्गत पुणे विभागात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला पुरस्कार जाहीर झाला. १५ ते १५ हजार लोकसंख्या गटात माळेगाव बु. (ता. बारामती) या नगर पंचायतीला राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.
या अभियानात पुणे महसूली विभाग राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा पहिला क्रमांकाचा विभाग ठरला आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठीचा राज्यस्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी यांना जाहीर झाला आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!