पुणे जिल्हा ग्रामीण

दौंड दिवाणी न्यायालय निर्मितीचा शासनाचा अंतिम आदेश निघाला – आ. राहुल कुल

दौंड(टिम – बातमीपत्र)
दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर ) स्थापन करण्यासाठी पदनिर्मिती सह शासनाची अंतिम मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आमदार कुल म्हणाले की , अनेक दिवसांपासून दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मागील भाजप सेना युती सरकारच्या काळात याला मान्यता मिळाली होती . मात्र त्यानंतर हे काम रखडलेले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या कामाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे व आवश्यक असणाऱ्या पद निर्मितीसाठी दि. १९ एप्रिल रोजीच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. याबाबतची शासनाची अंतिम मान्यता मिळाली आज मिळली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तालुक्याच्या वतीने जाहीर आभार त्यांनी मानले
आज झालेल्या या अंतिम आदेशात १६ नियमित पदे व ४ बाह्ययंत्रणे द्वारे अशी २० पदे मंजुर करण्यात आली आहेत.
दौंड विधानसभेच्या निवडणुकीत दौंडकर नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान वाटत आहे .या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांना इतर कुठेही न जाता दौंड न्यायालयातच त्यांची कामे पूर्ण होणार आहेत याचा एक वकील या नात्याने मला अभिमान आहे असेही आमदार कुल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!