दौंड तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार , रावणगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश….
रावणगांव (टीम – बातमीपत्र)
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर रावणगाव (ता.दौंड) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
आमदार कुल यांच्या राहू येथील निवासस्थानी शनिवार दि.१० जुन रोजी पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला .यामध्ये रावणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासो आटोळे, माजी उपाध्यक्ष संतोष आटोळे, शिवाजी गावडे, दत्तात्रय आटोळे, सचिन कोकणे, शहाजी आटोळे,रोहिदास आटोळे आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून काम करत असतानाही परिसरातील विकास कामे होत नसल्याने पक्ष प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .
याप्रसंगी दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माऊली ताकवणे, पंचायत समितीचे माजी सदस्य मानसिंग गाढवे,भिमा- पाटस कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, संपत आटोळे,अरुण आटोळे, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम आटोळे, जितेंद्र नेमाडे, अतुल सांगळे, बाळू आटोळे, भाऊसाहेब गाढवे,विजय दिवटे, कुमार चव्हाण, पांडुरंग आटोळे आदी उपस्थित होते.