क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
दौंड हादरले ,दोन मुलांसह पत्नी आणि पतीची आत्महत्या
वरवंड(टिम – बातमीपत्र)
कौटुंबिक वादाच्या कारणास्तव दौंड तालुक्यातील वरवंड येथील एका डॉक्टरने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर दोन मुलांची देखील हत्या करत, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२),पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९),अदिवत अतुल दिवेकर (वय ९) व वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. अतुल हे पशुवैद्यकीय डॉक्टर असून त्यांची पत्नी पल्लवी ह्या शिक्षिका होत्या. कौटुंबिक वादातून हे कुरकृत्य घडल्याचे बोलले जात आहे.