पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

दौंडचे तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये, सुट्टी दिवशी असे काम केल्याने सर्वत्र होतेय चर्चा…

दौंड ( टीम – बातमीपत्र)
दौंड तहसिल कार्यालयात असणारी अस्वच्छता दुर करण्यासाठी स्वतः तहसिलदार अरूण शेलार रिंगणात उतरले असून कार्यालयीन स्वच्छतेबाबत त्यांनी मनाशी चंग बांधल्याचे दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तहसिलदारपदाचा पदभार नुकताच अरूण शेलार यांनी स्विकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी कामाला सुरवात केल्याचे पाहायला मिळत आहे. आज दि.१ जुलै शनिवार हा वार तसा शासकीय सुट्टीचा दिवस मात्र आज सकाळी ८ वाजताच तहसिलदार अरूण शेलार हे तहसिल कार्यालयात येतात, मागोमाग काही शिपाई येतात, मग सुरवात होते तहसील कार्यालय स्वछ करण्यास अनेक ठिकाणी धूळ साठलेली तर अनेक ठिकाणी थुंकीनी भिंती लाल केलेल्या आपल्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पहायला मिळत होते. तर काही ठिकाणी तुटलेल्या खुर्च्या, खराब पडलेल्या वस्तु होत्या खराब वस्तू उचलुन संपुर्ण कार्यालयाची इमारत साफसफाई करत आपल्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने धूवून घेतली.
दौंड मधील हे असे पहिलेच उदाहरण आहे की स्वतः एक तहसीलदार अधिकारी येवुन कार्यालयासह इमारत साफसाई करतात त्यामुळे तहसीलदार अरुण शेलार यांच्या या कामाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे…
दौंड मधील नवीन प्रशासकीय इमारतीत इतर विभागही आहेत, मात्र या विभागांमधील अनेक अधिकाऱ्यांना स्वच्छते ऐवजी घाणीचे डोहाळे लागल्याचे चित्र अनेकदा पाहिले व अनूभवले आहे, त्यामुळे त्या सर्व अधिकारी वर्गासाठी तहसीलदार अरुण शेलार यांच्या कामाचा एक शालूतील जोडाच असल्याचे बोलले जात आहे, प्रशासकीय इमारत स्वच्छ झाली आहे मात्र यापुढे नागरिकांनी ती कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!