अखेर दौंडच्या स्वतंत्र प्रांत कार्यालयचा प्रश्न मार्गी , आमदार कुल यांची माहिती
सरकार बदलताच वर्षभरातच मार्गी लागला प्रांत कार्यालयचा प्रश्न
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंडच्या उपविभागीय कार्यालयासाठी शासनाने मागविले हरकती व सूचना मागविल्या असुन राज्य शासनाकडून राज्यपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आश्वासनातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता केली असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यवत येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार राहुल कुल म्हणाले की,
Bदौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले होते त्याची पूर्तता होताना दिसत असून नुकतेच राज्य शासनाने दौंड स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. या हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२३ आहे.
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याची अधिसूचना शासकीय राजपत्राद्वारे शासनाने दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी काढली असून, सूचना व हरकती मागविण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब झाल्यामुळे हे कार्यालय सुरु करण्याची प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर आमदार राहुल कुल यांनी पुन्हा शासनाकडे पाठपुरवा करून तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाकडे बैठका घेऊन, विधिमंडळाच्या वेगवेगळ्या अधिवेशनात हि प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकतेच हे राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
दौंड तालुक्यासाठीचे हे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी मागील अनेक दिवस प्रयत्न सुरु होते मात्र याकडे तत्कालीन सत्ताधारी यांनी बघितले ही नव्हते मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे काम मार्गी लागत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याच्या या प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या विधानसभा प्रचारातील आणखी एक महत्वाचे आश्वासनाची पूर्तता करण्यात त्यांना यश आले आहे.