विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करणे गरजेचे- हभप समाधान महाराज शर्मा
राहू (टीम – बातमीपत्र)
आजचा पराभव हा उद्याचा विजय असतो. जगावेगळं व्हायचं असेल तर आपणही काही तरी वेगळे करुन दाखविणे आणि जगणे गरजेचे असते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करणे गरजेचे असल्याचे मत ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांच्या 22व्या पुण्यस्मरण निमित्त राहू येथील कैलास विद्या मंदिरामध्ये ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,माजी आमदार रंजना कुल व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल यांच्या हस्ते स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी जि. प.चे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, जेष्ठ नेते नंदू पवार,जि. प. च्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, भाजप चे तालुकाद्यक्ष माऊली ताकवणे,आनंद थोरात, महेश भागवत, हरिभाऊ ठोंबरे,बंडोपत नवले,मारुती मगर,दादासाहेब कोळपे,शरद कोळपे,किसन शिंदे, विकास शेलार, चंद्रकांत नातु, तुकाराम ताकवणे, दिलीप देशमुख,सुजाता सोनवणे,मनीषा नवले,परशुराम शिंदे, चिमाजी कुल आधी तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राहुल टेंगले यांनी केले. आभार प्रकाश जगदाळे यांनी मानले.