पुणे जिल्हा ग्रामीण

दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप तर सचिवपदी रामदास डोंबे बिनविरोध

यवत (टीम – बातमीपत्र) मराठी पत्रकार परिषद संचलित व पुणे जिल्हा पत्रकार संघ सलन्ग दौंड तालुका मराठी पत्रकार संघाची द्वीवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र जगताप (दै महाराष्ट्र टाइम्स), तर सचिवपदी रामदास डोंबे (दै पुढारी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे : नरेंद्र जगताप (अध्यक्ष), शरद रणदिवे (उपाध्यक्ष), रामदास डोंबे (सचिव), संदीप नवले (कोषाध्यक्ष), संतोष काळे (कार्याध्यक्ष), अमरसिंग परदेशी (सदस्य), त्रिभुज शेळके (सदस्य), जीवन शेंडकर (सदस्य), अक्षता हनमघर (सदस्या), मनोज खंडागळे (सदस्य), राजू जगदाळे (जिल्हा प्रतिनिधी), संदीप चाफेकर (जिल्हा प्रतिनिधी), रमेश वत्रे (हल्ला विरोधी कृती समिती) यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कामठे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश गायकवाड यांनी कामकाज पाहिले. यावेळी पत्रकार संघाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गेली. निवडणूक कार्यक्रमा प्रसंगी परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, दीपक देशमुख, रवींद्र खोरकर, विशाल धुमाळ, संदीप सोनवणे, अतुल बोराटे, भाऊ ठाकूर, अमोल बनकर, निलेश भुजबळ, सचिन आव्हाड, हितेंद्र गद्रे, दादा चौधरी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रवींद्र खोरकर यांच्या तीन वर्षाच्या कामाचा अहवालाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शेलार यांनी केले तर आभार दीपक देशमुख यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!