क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
अज्ञात चोरट्यांनी मारला साडेतीन लाखांच्या ऐवजावर डल्ला, दौंड तालुक्यातील रावणगावातील घटना…..
दौंड (टीम – बातमीपत्र)
रावणगाव (ता .दौंड) येथील राहत्या घरातून घरफोडी करून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना घडली असल्याची माहिती दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी हनुमंत दादा आटोळे (वय 35)(रा.रावणगाव , ता. दौंड, जि. पुणे) यांच्या येथील राहत्या घरी दि. 31 जुलै रोजी रात्री बारा ते सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करूत घरपोडी करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 48 हजार रुपयांची ऐवज चोरून नेला आहे याबाबतची फिर्याद दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून याप्रकरणी दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.