शिवसेनेच्या दौंड शहरप्रमुखपदी रोहन घोरपडे
शिवसेनेची शहर कार्यकारणी जाहिर...
दौंड (टीम – बातमीपत्र)
शिवसेनेच्या दौंड शहरप्रमुख पदी रोहन घोरपडे यांची निवड करण्यात आली असुन त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्रही नुकतेच देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या दौंड शहरप्रमुख तसेच संपुर्ण कर्याकारणीची निवड करण्यात आली असुन कार्यकारणी पुढीलप्रमाणे – योगेश बलाढ्ये- उपशहर प्रमुख , प्रतीक बनसोडे – युवासेना शहरप्रमुख , तुकेश धोंडीबा कांबळे -कामगार सेना शहर प्रमुख या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी तालुका समनवयक श्री अर्जुन मडवाले ,वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख अमोल जगताप, महिला आघाडी संघटिका दुर्गा सुरवसे ,महिला आघाडी समन्वयक मनीषा नेरलेकर, वैद्यकीय मदत कक्ष महिला आघाडी जानवी चोळके ,राकेश भोसले ,बाळ हातागळे, किरण खडके, विकी थोरात ,शशिकांत तूपसौंदर्य आधी शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे संपर्क शिवतारे , शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे , जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे , तालुकाप्रमुख अँड बापूसाहेब दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरात काम करून पक्षाची ध्येय धोरणे व विकास नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचेही शहरप्रमुख रोहन घोरपडे यांनी सांगितले.