पुणे जिल्हा ग्रामीणराजकीयविशेष बातमी

रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रिय रस्ते निधी मिळावा – आमदार राहुल कुल यांची केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

दौंड (टीम- बातमीपत्र)
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या कामासंबंधित विविध समस्यांवर चर्चा करत दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी भेट घेतली यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली . यामध्ये पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत उन्नत महामार्ग उभारण्या संदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. पुणे सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस , मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठीक ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम व्हावे याबाबत आमदार कुल यांनी मागणी केली होती त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी सर्व्हिस रोडची कामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावीत. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी तसेच कुरकुंभ येथील धोक्याची व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित केलेली आहेत त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्ताव तयार करण्यात आलेला असुन या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी. न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड (ता. दौंड)येथे अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा. केंद्रीय रस्ते निधी द्वारे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर खोरवडी येथे रेल्वे अंडर ब्रिज उभारण्यात यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या या मागण्यांबाबत दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.
यावेळी माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!