सराईत टोळी यवत पोलिसांकडून जेरबंद, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता……
यवत (टीम-बातमीपत्र)
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटस येथे दरोड्याच्या तयारीतील रेकॉर्डवरील सराईत टोळी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.
या अटक केलेल्या आरोपीकडून एक गावठी पिस्टल,काडतुस,कोयता कटावणी,चारचाकी वाहन असा ४ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १२. ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पाटस (ता.दौंड जि. पुणे ) गावच्या हद्दीत सोलापूर-पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या तलावाच्या बाजूला आरोपी दत्ता अशोक शिंदे ( रा.राहू ता.दौंड जि. पुणे) , सचिन लक्ष्मण भोसले (रा.आष्टी ता.आष्टी जि. बीड), सचिन संतोष बेलदार (रा.येवला ता.येवला जि .नाशिक) , मल्हार अंबादास अडागळे (रा.रवळगाव ता.कर्जत जि.अहमदनगर) असे दरोड्याच्या तयारीत असताना पकडले आहेत.
आरोपी मामा उर्फ मैत्रीण रिकेबी (रा.कुर्डुवाडी ता.माढा जि. सोलापूर) हा पळून गेला आहे.
हे आरोपी यवत पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील फरार आरोपी असून सर्व आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत .
या आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी यवत पोलीस स्टेशन,शिरूर,मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत डीपी चोरीचे गुन्हे केलेचे कबूल केले असून आरोपींकडे सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे करत आहेत
हि कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले,पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार संजय देवकाते,निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप,अजित काळे,मेघराज जगताप,प्रमोद गायकवाड, महेंद्र चांदणे,राजीव शिंदे, पो.काॅ.मारूती बाराते,समीर भालेराव यांनी केलेली आहे.