नानविज सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपा आमदार राहुल कुल समर्थक संतोष पाटोळे विजयी……….
दौंड (प्रतिनिधी)
नानविज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष विलास पाटोळे यांची निवड करण्यात जाहीर करण्यात आली आहे.
नानविज (ता.दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमनपदाची निवडणुक आज दि .२२ रोजी दौंड येथील सहकार भवन येथे पार पडली. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या गटाकडून संतोष विलास पाटोळे यांनी व विरोधी गटाकडून विशाल बाळासाहेब पाटणकर यांनी चेअरमनपदासाठी अर्ज दाखल केले होते. यानंतर मतदान प्रकिया झाली यामध्ये संतोष विलास पाटोळे यांना ८ मते व विरोधी विशाल पाटणकर यांस ५ मते मिळाली असल्याने चेअरमनपदी संतोष विलास पाटोळे यांची निवड जाहीर करण्यात आली.
यापूर्वी नानविज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व होते मात्र तरीही आमदार राहुल कुल गटाने चेअरमनपद खेचुन आणत सत्ता मिळवली आहे.