पंधरा लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलिस शिपायवर गुन्हा दाखल …….
यवत (टिम – बातमीपत्र)
खुनाच्या गुन्ह्यात गुंतायचे नसेल तर पंधरा लाख रुपये द्या अशी खंडणी मागणाऱ्या पोलिसावरच यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राहुल बबनलाल भंडारी (रा.वरवंड, ता.दौंड, जि.पुणे) यांचे सासरे सुरेश नेमचंद गांधी यांचा दि.२७ मार्च २०२२ रोजी फिर्यादी राहुल भंडारी यांचे भाऊ राकेश व त्याच्या मित्रांनी गळा दाबून खून केला होता.याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असे आरोपी सागर गोविंद शिंदे( पोलिस शिपाई , पुणे शहर) (रा. वरवंड ,ता. दौंड ,जि.पुणे) याने सांगत या खुनाच्या गुन्ह्यात तुमचे संपूर्ण कुटुंबाला गुंतायचे नसल्यास पंधरा लाख रुपये रोख द्या अशी धमकी देऊन आरोपी पोलीस शिपाई सागर शिंदे याने आठ लाख रुपये खंडणी घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकारणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे करीत असल्याचेही पोलिस निरिक्षक शेडगे यांनी सांगीतले.