क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
वर्कशॉपमध्ये पेंटिंगसाठी असणारी ट्रॉली नेली चोरुन , गुन्हा दाखल
यवत (टिम-बातमीपत्र)
राहु (ता. दौंड) येथील वर्कशॉपमध्ये पेंटिंगसाठी लावलेली ट्रॉली चोरून नेले असण्याची घटना घडली असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली
याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी संतोष दादासो लव्हे ( व्यवसाय-वेल्डिंग वर्कशॉप, राहु, ता.दौंड जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यामध्ये त्यांच्या राहू येथील विकास इंजिनिअरिंग वर्कशॉप येथे पेंटिंग करता लावलेली ट्रॅक्टरची चार चाकी ट्रॉली कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे असे म्हटले आहे. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी पुढील तपास पोलिस हवलदार कदम करीत आहे.