पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमीशैक्षणिक
शिक्षकांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन….
दौंड (टिम – बातमीपत्र)
शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फौंडेशनच्या अध्यक्षा वैशाली नागवडे व सचिव प्रशांत गिरमकर यांनी दिली.
याबाबत माहिती देताना वैशाली नागवडे व प्रशांत गिरमकर म्हणाले की, शिक्षक दिनाचे औचित्य साधून इन्स्पायर्ड विंग्ज एज्युकेशनल फौंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
दि. ९ सप्टेंबरला दौंड पंचायत समिती सभागृहात करण्यात आले आहे. या वकृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
दि.५ सप्टेंबर पर्यंत ९८९०१६९७२४ या व्हाट्स ऍप क्रमांकावर करावी नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.